
तातडीने पंचनाम करून नुकसान भरपाई देण्यात यावी
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
.उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील निंगनूर व नागेशवाडी परिसरामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे . या परिसरातील शेतकरी कधी ओला दुष्काळ तर कधी कधी कोरडा दुष्काळ अशा अस्मानी संकटाला सामोरे जावे वाहत आहे. या अगोदर निंगनूर नागेशवाडी या भागात अनेक शेतकरी आत्महत्या यापूर्वी झाल्या आहेत. नागेश्वर येथील नाल्याच्या काठावरील दोन्ही काठावर असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत .या नुकसानीचे पंचनामा तातडीने करून शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत देण्यात यावी अशी अपेक्षा निंगनूर व नागेशवाडी या परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.

.प्रतिक्रिया.
सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे निंगनूर व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागेशवाडी नाला काठावरील दोन्ही काठावरच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली आहे या झालेल्या नुकसानीबाबत उमरखेड तहसीलदार साहेब व निंगनूर येथील तलाठी यांना फोन द्वारे कळविण्यात आले आहे .व झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून शासनामार्फत मदत मिळून देण्यात यावी अशी विनंती केली आहे .पाऊस कमी होताच झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामा करण्यात येईल असे तलाठी भालेराव साहेब यांनी आश्वासन दिले आहेत.
अंकुश विक्रम राठोड मा. उपसरपंच. तथा ग्रामपंचायत सदस्य निंगनूर

