
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागली आहे तर नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाचताच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला वेग दिला आहे गल्लीबोळात बाजारात आणि शेताच्या बांधावर सुद्धा चर्चेचा विषय रंगात आहे तो म्हणजे कोणाच्या बाजूने राहावे स्थानिक पातळीवर अनेक नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली असून जुन्या अनुभवी नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे मतदारांच्या गाव भेटींना वेग आला आहे कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे यावेळी कोण बाजी मारणार हा प्रश्न मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे या निवडणुकीत एकमेकांचे पाहुणे मित्रमंडळी एकाच गटात विविध पक्षाकडून इच्छुक आहेत अशा परिस्थितीत कुणाच्या बाजूने उभे राहावे हेच कळत नाही.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर मागील काही महिन्या पासून सर्वत्र इच्छुक मंडळीनी पक्षांतर करण्याचा सपाटा लावला आहे. आणि अतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असल्याने सर्वच इच्छुक मंडळी तिकिटावर तर दावा करीत आहेतच शिवाय काही जण छातीठोकपणे सांगत आहे.परंतु वर्षानुवर्षे काम करूनही मागच्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळाले नाही त्यामुळे आता तिकिटासाठी काही पदाधिकारी रात्रंदिवस सर्कलमध्ये जाऊन सामाजिक कार्य करत मतदाराची जवळीत साधत आहेत तर काही पदाधिकारी बैठकीतून मार्गदर्शन करत आहेत. मात्र इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असली तरी यावेळेसच्या निवडणुकीत खरी परीक्षा आहे ते जिल्हास्तरावरील प्रक्षश्रेष्ठीची निवडणुका लाभल्यामुळे इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे पक्षातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपलेच असल्याने आता तिकीट नेमके द्यावी तरी कुणाला असा प्रश्न पदाधिकाऱ्यापुढे आहे अशा परिस्थितीत मार्ग कसा निघेल यावर बंद दाराआढही चर्चा सुरू झाल्या असून यात आता समजूतदाराचा मात्र बळी जाण्याची शक्यता आहे.
