
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे हरित सेनेच्या माध्यमातून दिनांक 3 मार्च 2025 ला जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. जागतिक वन्यजीन दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये छोटेखानी कार्यक्रम घेऊन वन्यजीव व त्यांच्या अस्तित्वामुळे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कशा प्रकारे मदत होते याची सविस्तर माहिती शाळेचे हरित सेना प्रमुख गोपाल बुरले यांनी दिली.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त शाळेचे प्राचार्य विजय कचरे सर, उपप्राचार्य श्री सुरेश कोवे सर,तसेच पर्यवेक्षक श्री सुचित बेहेरे सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
जागतिक वन्यजीव संरक्षण च्या निमित्ताने शाळेमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वर्ग आठवा व नववीच्या विद्यार्थ्यांनी भरघोष प्रतिसाद देत निबंध लेखन करून योग्य प्रतिसाद दिला.
राळेगाव च्या वनपरिक्षेत्र अधिकारी कु. एम. के. गुंडकवार , वनरक्षक सुधाकर भा. सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
