16 फेब्रुवारीपासून राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव

सहसंपादक : रामभाऊ भोयर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव साजरा केला जात आहे या निमित्य शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे शिव महोत्सव सोहळा पालकमंत्री मा संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईलउपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले किंग ऑफ नागपूर यांच्या शुभहस्ते शिव महोत्सव चेउद्घाटन होईल याप्रसंगी खासदार भावना गवळी आमदार डॉ अशोक ऊइके माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके माजी मंत्री संजय देशमुख व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न होईल दिनांक 16 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रथमेश इंदुलकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे 18 तारखेला विविध कार्यक्रम किल्ले स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच विशेष उपक्रम म्हणून महिलांकरता वेशभूषा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर आयोजित केली आहे सर्व स्पर्धेंना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत 19 तारखेला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले सायंकाळी पाच वाजता राळेगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल तरी सर्व शहरातील व तालुक्यातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी आपल्या घरासमोर रांगोळी काढून सायंकाळी घरासमोर दिवे लावून रोषणाई करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आव्हान छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात येत आहे