एस. एस. सी.परिक्षा मार्च 2023 मध्ये राळेगाव तालुका निकाल 87.47 टक्के न्यू इंग्लिश हायस्कूल,राळेगाव चा विद्यार्थी अशर अशफाक शेख 95.0 टक्के गुण घेऊन राळेगाव तालुक्यातुन प्रथम

राळेगाव तालुक्यातील यावर्षी एस. एस. सी. परिक्षा करिता फॉर्म भरलेले विद्यार्थी संख्या -1275 इतकी असून
प्रत्यक्षात एस. एस. सी.परिक्षेला उपस्थित विद्यार्थी-1253 आहे तर
प्राविण्य प्राप्त विद्यार्थी-195
प्रथम श्रेणी विद्यार्थी–415
द्वितीय श्रेणी विद्यार्थी–398
तृतीय श्रेणी विद्यार्थी –88. उत्तीर्ण झाले असून
राळेगाव तालुक्यातील यावर्षी एस. एस. सी.परीक्षा उत्तीर्ण एकूण विद्यार्थी संख्या—1096 आहे. तर
राळेगाव तालुक्यातील निकालाची टक्केवारी 87.47 % इतकी असून यावर्षी राळेगाव तालुक्यातील महावीर इंग्लिश स्कूल, राळेगाव, स्मॉल वंडर स्कूल, वडकी, बापूसाहेब देशमुख विद्यालय, जळका, बोधिसत्व विद्यालय, सराटी या शाळेनाचे निकाल 100% लागले आहे, एस. एस. सी. परीक्षेत अनेक विद्यार्थी आज ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी कॉम्प्युटर सेंटर वर विद्यार्थी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षी एस. एस. सी. परीक्षाचा निकाल लवकरच लागल्या मुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान दिसून येत होते…. यावर्षी च्या निकालचे विश्लेषण म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत प्रविण्य प्राप्त विद्यार्थी संख्या यावर्षी घटली असून राळेगाव तालुक्याचा निकाल सुद्धा यावर्षी माघारला आहे ही मात्र एक चिंतेची बाब आहे..