शिवसैनिकांनी दलितवस्ती सुधार योजनेतील शिवाजी नगर मधील निकृष्ठ नालीचे बांधकाम बंद पाडले चौकशीची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव शहरात नगरपंचायत कडून दलितवस्ती सुधार योजनेतून नालीचे कामे सुरु आहेत कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याचे तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगरपंचायत पदाधिकारी यांना तोंडी सांगितले होते. आज दि.13-7-23 रोजी शिवसैनिकांनी शिवाजी नगर मधील नाली बांधकामाची चौकशी केली असता.
1.नालीचे बेड काँक्रीट चार ईंच सुद्धा नाही तरी सुद्धा नालीचे बांधकाम करीत आहे. नाली बांधकाम करतांना लोखंडी राडचे अंतर कमी तर कुठे जास्त आहे. बांधकाम झालेल्या नालीत उघडे राग आहेत कोटींग दिसत नाही. नालीचे बेड काँक्रीट कमी ईंच गिट्टीत आहे. सिमेंटचा वापर कमी प्रमाणात आहे मसाला दबाई करण्यासाठी कोणतेही साधन नाही असे हे निकृष्ठ नालीचे बांधकाम शिवसैनिकांनी बंद पाडले पंचणामा चौकशी झाल्याशिवाय काम करु नये अशी भुमिका शिवसैनिकांनी घेतली व तसे रितसर नगरपंचायतला निवेदन दिले. निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसैनिक उग्र स्वरुपाचे आंदोलन उभारेल असे वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधी जवळ सांगितले. राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार महोदय या निकृष्ठ बांधकाम ठेकेदारावर कार्यवाही करतील का त्याला सहकार्य करतील अशी जनमानसात चर्चा आहे निवेदनावर शिवसैनीकासह प्रभागातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
प्रमुख उपस्थितीमध्ये दिपक येवले (उप शहर प्रमुख), सिद्धांत थुल ,विजय शेंडे, रोशन उताणे,अंकुश गेडाम,आकाश देवकर,सुनिता संदीप ढगले,वैशाली भारसागळे,सुनिता थुल, अनिता कांबळे, निलीमा कडु,शंकर गायधने,इमरान पठाण, सुनिल क्षिरसागर सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.