राळेगावात ४ फेब्रुवारी ला भीम बुद्ध गीतांचा दुय्यम स्वरांजली मुकाबला

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

२६ जानेवारी भारतीय संविधान अंमलबजावणी दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने राळेगाव नगरीत प्रथमच ४ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारला शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ यांचे भव्य प्रांगणात सायंकाळी पाच वाजता टीव्ही सिंगर गायिका मंजुषा शिंदे पुणे व टीव्ही सिंगर गायक अनुप कुमार कांचवाला नागपूर यांचा भीम बुद्ध गीतांचा दुय्यम स्वरांजली मुकाबला होणार आहे. या भीम बुद्ध गीतांच्या दुय्यम स्वरांजली मुकाबला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल लढे हे असणार आहे तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माझी शिक्षण मंत्री तथा माजी विधानसभा अध्यक्ष वसंत पुरके हे असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र शेराम तर प्रमुख अतिथी म्हणून गोपीचंद कांबळे(विद्यार्थी पुरतत्व संशोधक) गोवर्धन वाघमारे, माजी संचालक बाजार समिती राळेगाव ,अशोक केवटे,माजी सभापती पंचायती समिती राळेगाव अंकुश मुनेश्वर सरपंच संघटना अध्यक्ष राळेगाव ,शामकांत येनोरकर माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव, तथा ज्येष्ठ पत्रकार महेश शेंडे पत्रकार संघटना अध्यक्ष राळेगाव हे असणार आहे.
तरी राळेगाव तालुक्यातील जनतेनी या भीम बुद्ध गीतांचा दुय्यम स्वरांजली मुकाबला कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.