
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ते मेटीखेडा मार्गावर असलेल्या महावीर जिनिंगला आज पहाटे २:३० वाजेच्या सुमारास प्रेस मशीन मध्ये शॉर्ट ने आग लागली असून या आगीत साधारणता नुकसान झाले असून प्रेस मशीन जळाल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे. या महावीर जिनिंग मध्ये आशा पुरा फायबर या खरीपदारांची खरेदी सुरू होती खरीददार यांच्याकडून माहिती घेतली असता जिनिंगमध्येरात्रीच्या वेळी गठन काढण्याचे काम सुरू असताना ही आग शॉर्ट सर्किटने अचानक लागल्याने येथीलआगीची माहिती मिळताच यवतमाळ आणि राळेगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
जिनिंग मध्ये हजारो क्विंटल कापूस साठवलेला होता त्याच बरोबर रुईच्या गठानी मोठ्या प्रमाणात होत्या तसेच मोठ्या प्रमाणात साठवून होती परंतु यात कुठल्याही प्रकारचं नुकसान झाले नसून केवळ मशीनचे व बाजूला असलेला डस्ट व २० ते २५ कापसाच्या गठाणी जळून खाक झाले असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे
या आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा पंचनामा झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिनिंग व्यवस्थापन आणि स्थानिक महसूल
विभागाने घटनास्थळाची पाहणी केली असून, झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कापूस उत्पादक आणि प्रक्रिया उद्योगांनी आगीच्या घटनांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी अग्निशमन विभागाकडून करण्यात आले.
यवतमाळ येथील अग्निशमन दलाने अग्निशमन अधिकारी विनोद खरात यांच्या नेतृत्वात वाहन चालक राहुल यादव, फायरमन हेमंत डोंगरे, रवी चौधरी आदींनी आपली चोख कामगिरी बजावली तर राळेगाव येथील अग्निशमन पथकातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
