
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभा मतदार संघात आज कळंब येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राळेगाव विधानसभा प्रभारी श्री. जयंत दळवी व माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके प्रमुख उपस्थित होते.
या वेळी आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, संघटना वाढीसाठीच्या उपाययोजना व कार्यकर्त्यांची एकजूट या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत कळंब तालुक्यातील ज्येष्ठ नेते नरेंद्र मानकर, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती महादेवराव काळे, कळंब तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र पोटे, राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, बाभुळगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन बनकर, खरेदी विक्री कळंबचे विरेंद्र केशववार, राळेगाव शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप ठूणे, कळंब शहर काँग्रेस अध्यक्ष सोनु सिध्दीकी, महिला काँग्रेस कळंब तालुका अध्यक्षा सौ. गायत्री नवाडे यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
