
सहसंपादक: रामभाऊ भोयर
एका संघाच्या विरोधात दुसरा संघ खेळामध्ये असणे आवश्यक आहे आणि तेही तुमच्या विजयाचं अभिनंदन व कौतुक करणारा असला तरच क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडू वृत्तीचे दर्शन घडते असे मत महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव द्वारा आयोजित RPL चषक 2023 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून व्यक्त केले.
यावेळी बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना राज्याचे माजी शालेय शिक्षण तथा क्रीडा मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सांगितले की आदरणीय शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवडी करिता देशातील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभाग केल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी ग्रामीण भागातून आलेल्या महेंद्रसिंग धोनी यांना मिळाली आणि यावरून ग्रामीण भागातही गुणवत्ता असलेले खेळाडू सापडतात, त्यांना मैदान व अश्या पद्धतीच्या क्रीडा स्पर्धेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून वरोरा विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामीण भागात कबड्डी आणि क्रिकेट सारखे मैदानी खेळ काही काळापूर्वी लोप पावत चालले होते, मात्र अलीकडच्या कबड्डी व क्रिकेट खेळाची खूपच क्रेज वाढली असून अश्या पध्दतीचे सामन्याचे आयोजन होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान क्रिकेट क्लब यावली, द्वितीय मॉर्निंग ग्रुप कळंब, तृतीय समर्थ पेट्रोलियम कळंब आणि चतुर्थ बिलाल ब्लॅक पॅंथर राळेगाव यांनी पटकाविले तर या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू ठरला तो कळंब चा नसीम.
या बक्षीस वितरण सोहळ्याकरीता काँग्रेस प्रवक्ता गाडे पाटील, राळेगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनागराध्य जानराव गिरी, अरविंद वाढोनकर, मिलिंद इंगोले, राजेंद्र तेलंगे, गजानन अक्कलवार, नगरसेविका कमरूनिस्सा पठाण, पुष्पा किन्नाके, लियाकत अली सैय्यद, प्रवीण गिरी, वृषभ ठाकरे, मंडळाचे उपाध्यक्ष अशोक भागवत सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव फिरोज लाखाणी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण टीप्रमावर यांनी केले.
या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण you tub द्वारे केल्यामुळे सर्वदूर हे सामने क्रीडा रसिकांना पाहता आल्यामुळे मंडळाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
