
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव गणेश नगर परिसरात एका घराचे बांधकाम सुरू असताना बांधकाम मजूर कैलास महादेव अरबट वय 21 वर्ष या मजुराचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला तर दुसरा मजूर विजू मारोतराव वरठी वय 45 वर्ष हा गंभीर जखमी असून राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे प्राप्त माहितीनुसार….. गणेश नगर परिसरात अतुल उघडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे टॉवरचे बांधकाम सुरू आहे टावर जवळच काही अंतरावर वरून हाय व्होल्टेज लाईन गेलेली आहे त्याच्या तारा टॉवरच्या अगदी जवळ आहे बांधकाम साहित्य लोखंडी पाईप वर चढवितांना लोखंडी पाईप विजेच्या ताराच्या संपर्कात आल्याने जबर झटका बसला त्यात कैलास अरबटचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मजूर विजू वरठी याचे हात भाजल्या गेले तो ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातील नागरीक गोळा झाले जखमींना रुग्णालयात दाखल केले. _आईचा एकुलता एक मुलगा गेला…. कैलास अरबट हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता कैलास च्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो आपल्या आईला रोज मजुरी करून जगवत होता यातच त्याचा मृत्यू झाल्याने त्याची आई हवालदली झाली आहे अतुल हा आपल्या आईसोबत राळेगाव येथील शिवाजीनगर परिसरात राहत होता. तर दुसरा मजूर विजू वरठी डोंगरखर्डा येथील रहिवासी आहे. बांधकाम करताना कोणतीही काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचे परिसरात बोलल्या जाते याबाबत विद्युत महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता किशोर तुरणकर यांनी सांगितले की वितरण कंपनीची लाईन ही रोडवर आहे बांधकाम मजूर हा वीस फुटाचा लोखंडी पाईप घेऊन वर होता त्याचा तोल गेल्याने पाईप लाईनच्या संपर्कात आला त्यामुळे ही घटना घडली याला विद्युत वितरण कंपनी कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही बांधकाम करताना योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे असते
