यवतमाळ वाय-पॉईंट वरील सौदर्यीकरण उध्वस्त करत अतिक्रमण करणाऱ्या कोलडेपोवर कारवाईची मनसेची मागणी

बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या वणी- यवतमाळ, नागपूर या वाय पॉईंट वर खनिज निधीअंतर्गत लाखो रूपये खर्च करून वाय-पाईंटचे सौदर्यीकरण करण्यात आले होते.परंतु सद्यस्थितीत सौदर्यीकरण दिसत नाही, काही कोळसा व्यापाऱ्यांनी सौदर्यीकरण नष्ट करून त्या जागेवर अतिक्रमण करून तिथे कोलडेपो उभे केले आहे.येताना जाताना वाहन न दिसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात झालेले पहावयास मिळते, या रस्त्यावरून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोल डेपो काढण्यात यावे यासाठी मनसे तालूकाध्यक्ष फाल्गून गोहोकार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांना निवेदन दिले आहे.

शासनाच्या पैशाची लूट होऊन सौंदर्यीकरण नष्ट करूनही बांधकाम विभाग गप्प का, सदर कोल डेपो धारकाकडून संपूर्ण सौदर्यीकरणाची एकमुखी रक्कम वसूल करून संबंधित जागेवरचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, व सदर अतिक्रमण धारकावर फौजदारी गुन्हे दाखल करून यापुढे अतिक्रमण करणार नाही याची दक्षता घ्यावी असे न केल्यास मनसे बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये अतिक्रमण करेल, असा इशारा
निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी मनसेचे तालुका अध्यक्ष व शहर पदाधिकारी उपस्थित होते.