
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन – मल्टी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर, राळेगाव येथील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान हॉटेल मॅनेजमेंट चे 31 विद्यार्थी, ऑटोमोटिव्हचे 16 विद्यार्थी, कोटक- प्रथम सेंटर वरून दोन महिन्याचा कोर्स घेऊन पास झाले. त्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना टॉफी देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर श्री. जानरावजी गिरी (उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव), श्री. के. एस. वर्मा (पत्रकार तसेच अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पचायत, राळेगाव), श्री. विनय मुनोत (अध्यक्ष मेडिकल असोसिएशन, राळेगाव) सेंटर प्रमुख श्री. आशिष इंगळे, श्री. संदीप तंतरपाळे, मेंटर लीडर श्री. प्रमोद कांबळे, तसेच प्रथम राळेगाव ची संपूर्ण टीम किशोर काळे, स्नेहल नांदेडकर, गणेश बोरकर, श्याम महिंगे, चैताली अग्रवाल व इतर संपूर्ण स्टाफ उपस्थित होते.
प्रथम एज्यूकेशन फाउंडेशन हे बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम करीत असते. यामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील मूल सहभागी होत असतात दोन महिन्याचा कोर्स करून ही मुलं वेगवेगळी प्रशिक्षण घेतात.. याच प्रसंगी अनेक
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण सर्व विद्यार्थी चांगल्या पंच तारांकिक हॉटेल्स व कंपनीमध्ये 14 हजाराच्या वर पगारावर काम करणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह गगनभरारी घेताना दिसत होता.
