तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा


प्रमोद जुमडे/हिंगणघाट

हिंगणघाट. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून 2024 शुक्रवारला आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय आशा मेश्राम मॅडम, क्रीडा अधिकारी माननीय अनिल निमगडे, संदीप खोब्रागडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या आंतरराष्ट्रीय योगा दिनाला प्रमुख पाहुणे माननीय योग गुरु अजय जी वानखेडे, माननीय वैशाली वणीकर, संजय मेमोरियल टीचर्स एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट सचिव महोदय, माननीय राजीव महाजन मुख्याध्यापक संजय गांधी स्मृती विद्या मंदिर , हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी. एल. खांडरे, क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्स, अजय बारसागडे, किड्स ब्राईट फ्युचर क्लब चे सर्व खेळाडू, वॉरियर्स क्लब चे सर्व खेळाडू, बीसीसी बॉक्सिंग क्लब चे खेळाडू तसेच किक बॉक्सिंग , बॉक्सिंग चे सर्व खेळाडू संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका क्रीडा संयोजक बी. एल. खांडरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्स, अजय बारसागडे, किड्स ब्राईट फ्युचर क्लब चे सर्व खेळाडू, वॉरियर्स क्लब चे खेळाडू, बीसीसी ग्राउंडचे सर्व खेळाडू यांनी सहकार्य केले.