कृषिदुतांनी शेतकऱ्यांना दिली शेततळ्या बाबत माहिती

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

कृषि कार्यानुभव कार्याक्रम 2022 अंतर्गत मारोतराव वादफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी ओम महल्ले, सुमेध सुरेशराव भोयर, चैतन्य नरसिंग राठोड,प्रणय साहेबराव मून, वैभव रवींद्र गावंडे .यांनी शेतकऱ्यानसोबत शेततळ्यावर जाऊन शेततळ्या बद्दल माहिती दिली.
शेत तळ्याची गरज का असते शेततळ्याची लांबी, ऊंची किती असावी इत्यादि गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या. त्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी तर करूच शकतो पण मत्स्य शेती देखील करू शकतो इत्यादि माहिती त्यांनी शेतकऱ्यांना संगीतली.
हा उपक्रम प्राचार्य डॉ. आर. ए ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्हि. महानूर, विषय तज्ञ प्रा. ए.डी.उतखेडे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला .