खैरी ग्रामपंचायत मध्ये शुद्ध व शितल पेयजल(R.O.) सयंत्राचा लोकार्पण सोहळा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी ग्रामवासियांना शुद्ध व शीतलपेजल मिळावे याकरिता खैरी ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य सौ प्रीती ताई संजय काकडे यांच्याकडे जलशुद्धीकरण व शीतल पेयजल(R.O.) सयंत्राची मागणी केली तेव्हा जि.प.सदस्या सौ.प्रितीताई संजय काकडे यांनी विषेश प्रयत्न करून जि.प.१५ व्या वित्तआयोगातुन ४,२७,०९९ रुपये निधी मंजूर करुन खैरी ग्रामपंचायतला जलशुद्धीकरण व शीतलजन सयंत्र मंजूर करून दिले व मुदतीच्या आत जलशुद्धीकरण व शितल सयत्रांचे काम पुर्ण करून घेतले.
ग्रामपंचायत खैरी मधील शुद्ध व शितल पेयजल सयंत्राचा दिनांक २२-८-२३ रोजी खैरी ग्रामपंचायतच्या आवारात खैरी ग्रामपंचायतच्या सरपंच्या सौ. किरणताई तृषांत महाजन यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे , उपसरपंच डॉ. श्रीकांत ज्ञानेश्वर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. आता खैरी ग्रामवाशी यांना केवळ पाच रुपयात पंधरा लिटरची एक कॅन भरून शितल व शुद्ध पेयजल मिळणार आहे. स्वस्तामध्ये मिळणाऱ्या शुद्ध व शीतल पेजलामुळे खैरी गावातील नागरिकात आनंदमय वातावरण निर्माण झाले. शुद्ध व शीतल पेजल सयंत्र मिळवून देऊन लवकरात लवकर काम पूर्ण केल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने जिल्हा परिषद सदस्य सौ प्रीती ताई काकडे या उपस्थित नसल्यामुळे त्यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी या शुद्ध व शीतल पेयजल संयंत्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे खैरी ग्रामपंचायतचे सरपंच सौ किरण महाजन, उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत, ग्रा.पं.सदस्या.सौ.लता पवार,सौ.पुष्पा इंगोले,ग्रा.पं सचिव गजानन भोयर, खैरी गावातील प्रतिष्ठित नागरिक सुनिल गवारकर,विशाल पंढरपुरे,तृषांत महाजन,शारदानंद जैयस्वाल,शरद उघडे,खुशाल वानखडे, विनोद माहुरे ग्रा.पं.कर्मचारी राहुल मानकर,स्वप्निल गोफणे,संजय धोटे,बंटी फुलकर, व खैरी गावातील असंख्य नागरीक उपस्थित होते.