ढाणकी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चक्काजाम आंदोलन


प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आज रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव, सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव व तसेच चना व तुरीला नाफेड मार्फत ऑनलाइन नोंदणी करून त्वरित खरेदी सुरू करण्यात यावी , अशा विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॉप येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने आधीच शेतकरी मेटाकुटीस आला असताना. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खर्च जादा वजा नफा कमी यावर्षी शेतकऱ्यांना एकापाठोपाठ एक संकटाचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन पिके जास्त पाऊस झाल्या कारणाने हातातून गेली आलेले पीक नष्ट झालेले आहे. काही आशा तूर व कापूस या पिकांवर अवलंबून होत्या तर तूर व कापूस या पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव आल्या कारणाने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खत, बी, बियाणे ,औषधी सर्वच महाग परंतु काहीतरी पीक हाती लागेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी पिकांवर अतोनात खर्च झालेला दिसून येत आहे त्यातच उत्पन्न कमी होऊन सुद्धा पिकांना योग्य भाव नसल्यामुळे सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात शिवसेनेचे ज्येष्ठ व युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आपल्या भाषणातून चांगलीच तोफ डागली यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड , शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय कुंभरवार, शिवसेना उमरखेड विधानसभा संघटक प्रशांत जोशी, शिवसेना तालुका संघटक सचिन साखरे, ढाणकी शहर शिवसेना बंटी जाधव , मा सरपंच शिवाजी फाळके, शिवसेना शहर समन्वयक ढाणकी कांता वासमवार, शेतकरी तालुका प्रमुख गणेश नरवाडे, शिवसेना शहर संघटक अमोल आरमाळकर, मा नगरसेवक रमेश पराते, विभाग प्रमुख गजानन गायकवाड, अल्पसंख्याक तालुका प्रमुख एजाज पटेल, युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर, युवासेना सोशल मिडिया तालुका प्रमुख विशाल नरवाडे, मा ग्रामपंचायत सदस्य रमेश होले, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख ढाणकी गजानन आजेगावकर, उपशहर प्रमुख अशोक कोरटवाड, युवासेना समन्वय शैलेश कारकले,उपशहर प्रमुख बालाजी येरावार, युवासेना उपशहर पिंटू सुरोशे, उपशहर प्रमुख अभय सोनोने, उपतालुका प्रमुख गजानन जाधव, युवासेना विभाग प्रमुख अविनाश नाईकवाडे, उपशहर प्रमुख बजरंग ठाकूर, विभाग प्रमुख गजानन धोपटे, ई उपस्थित होते. व यावेळी आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार, प्रताप भोस यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.