
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
केंद्र व राज्य सरकारच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर ,बेरोजगार युवक हे त्रस्त झाले आहे महागाईने कळस गाठला आहे जिएस्टी ने जीवनाश्यक वस्तू महाग झाल्या आहे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसत असल्याने त्यांच्या समय्याना वाचा फोडण्यासाठी व केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेस कमेटी व शहर काँग्रेस कॅमेटीच्या वतीने बैलबंडी, ट्रॅक्टरच्या भव्य धडक मोर्चा तहसील कार्यालयांवरती धडकला शहरातून प्रमुख मार्गाने जाऊन तहसील येथे मोर्चाची सांगता झाली माजी मंत्री प्रा वसंतरावजी पुरके जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड प्रफुल्लभाऊ मानकर यांचे नेतृत्वात हा मोर्चा निघाला मोर्चमध्ये तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ,वाढलेली महागाई त्वरित कमी करावी,बेरोजगार युवकांना त्वरित रोजगार द्यावा,पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे त्वरित पुनर्वसन करावे तसेच त्यांना घरकुल मंजूर करावे,अतिवृष्टी व पुराणे खचलेल्या विहिरी शासकीय निधीतून बांधून द्याव्या ,पुरामुळे वाहून गेलेल्या शेतजमिनीला सरसकट मदत घ्यावी ,शेततळे व विहिरींना कृषिपंपासाठी तात्काळ विजजोडणी द्यावी ,इ पिकपाहनी तलाठ्यांनी करावी,शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा द्यावा आदी मागण्या मोर्चात करण्यात आल्या मोर्चात तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना देण्यात आले भर पावसात मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते हे विशेष मोर्चात काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष अरविंद वाढोनकर ,वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी ,खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले,नगराध्यक्ष रवींद्र शेराम,उपनगराध्यक्ष जानराव गिरी,सरपंच राजू तेलंगे,तालुकाध्यक्ष अरविंद फुटाणे ,शहराध्यक्ष प्रदीप ठुने,ग्राविका अध्यक्ष सचिन हुरकुंडे आदी काँग्रेसचे गावगावतील सरपंच ,पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
