
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
दि.26.01 2023 रोजी जि. प.उच्च प्राथमिक शाळा येवती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चौधरी हेअसून ध्वजारोहन मुख्याध्यापक बाबाराव घोडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचै व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यगण,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,तलाठी साहेब तसेच विद्यार्थांचे पालक वर्ग व सर्व प्रतिष्ठीत हजर होते.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेला जमिन दान देनारे दानशूर लक्ष्मणराव चौधरी आणि शाळेला विविध कार्यात सहकार्य करणारे रामाजी महाजन,दिवाकर कोरांगे,गीता पढाल,भाग्यश्री बन्सोड,जनार्दन पढाल,शशीकला पढाल,मसकरजी यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सायंकाळी सास्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र खुडसंगे तर आभार कुणाल सरोदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक बाबा घोडे,शिक्षक वृंद कुणाल सरोदे,राजेंद्र खुडसंगे,रविंद्र चालखुरे,कु.रुपाली बोंदाडे यांचे सहकार्य लाभले.
