(अंशकालीन स्त्री-परिचरांनी काळी साडी परिधान करून केला शासनाचा निषेध…. आम्ही शासनाच्या सावत्र बहीनी)
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री-परिचर कृती समितीचे राज्य व्यापी कॉल नुसार, यवतमाळ जिल्हा परिषदेवर जेलभरो आंदोलन करण्यात आले आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री-परिचरांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे शासनाचे चुकीचे धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी देत व काळी साडी परिधान करून केला निषेध. मा.सह संचालक, आरोग्य सेवा मुंबई , यांनी सकारात्मक वस्तुनिष्ठ मानधन वाढीचा अहवाल व प्रस्ताव दि.१४-०६-२०२४ रोजी मा.आरोग्य मंत्री, यांचेकडे पाठविला असून मा. तानाजी सावंत,आरोग्य मंत्री यांनी सदर प्रस्ताव वित्त विभाग व कॅबिनेटमध्ये पाठविलेला आहे परंतु अद्याप शासन निर्णय काढण्यात आला नाही त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदे समोर आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री – परिचर संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे गेटवर रास्तारोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले*
सदर आंदोलनात अंशकालीन स्त्री-परिचरांनी आपल्या सहपरिवारासह सहभागी झाल्या होत्या .
अंशकालीन स्त्री-परिचरांना किमान वेतन रू. २१०००/- देण्यात यावे, भरघोस मानधन वाढ देण्यात यावी, अंशकालीन नावात बदल करण्यात यावा, त्यांना प्रसुती रजा मंजूर करण्यात यावी, सेवा ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर घेण्यात यावे, कर्तव्यावर मृत्यू आल्यास सहाय्यता निधी मंजूर करण्यात यावा, अर्धं वेळ कर्मचारी म्हणून संबोधले जाते प्रत्यक्षात त्या पुर्ण वेळ काम करतात मात्र मोबदला अत्य अल्प दिला जातो. आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री-परिचरांना कर्मचारी दर्जा द्यावा, आरोग्य खात्यात कायम करावे याविषयी सर्व निर्णय सरकारने आचारसंहितेपुर्वी घ्यावेत अन्यथा
भविष्य काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे वतीने देण्यात आला.यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे,सिमा धवने ,सुवर्णा सोनुने, यशोदा झामरे, संगीता म्हैसकर, रूख्मीना सुर्यवंशी, सुलोचना अन्नछत्रे, रंजना तायवशांताबाई अल्का काळे, मुक्ता साबळे, गोदावरी काकडे, आशा कांबळे, कांता रोकडे, बेबीताई , गायकवाड, गोदावरी काकडे,पंचाबाई आस्वले, उषाताई शेंबळे,कमल वेले, रेखा लेंगरे , आशा कांबळे, उमा शीरनाथ, निर्मला कोल्हे , रमाबाई शंभरकर ,वर्षा पीसे, रंजना ढोक,सुमीत्रा जमदाडे,अनुसया सोनकुसरे, कल्पना सवाईमुन, उषा ढबाले, मंगला धवसकर, अल्का काळे, मंदा कांबळे, अंजना बोंनसुले कुसुम टेकाम ,जनाबाई पळवेकर , पण्यरथा काष्टे , स्वरसथी गोलाईत ,शिला रोकडे, वर्षा तोडसाम ,मंगला लंबे, वैशाली निबर्ते , लताबाई सांगळे,उषा राठोड, वंदना मागुळकर, मीरा वाघमारे , हंसमाला शेंडे, मीना राहीले, सुमीत्रा व्यवहारे, दुर्गा कोटनाके, जिजा रीगने,कल्पना सवाईमुन, संगीता पीस्तुलकर ,गीता कुळमेथे , गंगु तोडसाम , मंदा राउत, यशोदा चव्हाण, अर्चना चिकटे, बेबी ठाकरे, शेवंता पवार आशा बोबडे , सोनाली कडुकार , शेवंता पवार, रमा शंभरकर , मिरा वाघमारे ,उषा राठोड, बेबी ठाकरे ,वंदना माडगूळकर, अनुसया सोनकुसरे, संगिता वायदंडे, सुमित्रा जमदाळे , शशीकला भगत ,, गंगू तोङसाम , सुनीता भस्मे. जयश्री मरापे, पर्वता दाते , वेनु काबले , रंजना ढोके ,धोङाबाई आगोशे , सायराबी मुसा शेख, कविता राठोड ,अंजना सरकुडे ,मिना ठाकरे ,जमूना गंगावने, विद्या गिरोलकर, संगिता राठोड, कुसुम जोगदंडे, वंदना मागुळकर, छाया पडघाने, नंदा कांबळे, संगिता जाधव, वनिता मिराशे ,कमल कांबळे ,आशा बोबडे ,वणीता मीराशे सप्ताफुले कांबळे, ,प्रतिभा सुकळकर, सोनाली कुरडकार, लताबाई कांबळे, वर्षा पीसे,वंजेमाला राठोड, संगीता वायदंडे, सुभद्रा इंगळे यासह शेकडो महीलांना स्थानबद्ध केले.