
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत व स्पेक्ट्रम फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद शाळा, पिंप्री दुर्ग येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती पाचघरे मॅडम आणि प्रकल्प व्यवस्थापक नरेश बाजरे यांच्या हस्ते करण्यात आले. “पाणी वाचवा शेती वाचवा”, “सुपीक माती समृद्ध शेती”, “सुरक्षित शेतकरी निरोगी कुटुंब”,”निसर्गाशी मैत्री शाश्वत शेती”, “कापसापासून तर कपड्या पर्यंत”,आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या रंगीत चित्रांतून कल्पकता सादर केली. विद्यार्थ्यांच्या चित्रांतून सर्जनशीलता व सामाजिक जाणीव दिसून आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पेक्ट्रम फाउंडेशनच्या प्रतिनिधीं लक्ष्मण यादस्कर,वैभव इजापडे तसेच शाळेतील शिक्षकवृंद श्री ईश्वरकर सर,श्रीमती अक्कलवार मॅडम यांनी बाल मजुरी बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. परीक्षण समितीच्या निर्णयानुसार विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच शिक्षणासोबत कलाविष्काराला चालना मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
