
राळेगाव विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे आहे.कारण की ही जी सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार हालाखीचे जीवन जगत असल्याने शेतकऱ्यांना मतदारांना सत्ता बदल हवा असल्याने प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असून गावागावात पुरके सरांना मिळणारा प्रतिसाद हा जणूकाही विजयी मिरवणूक निघाल्यासारखा मिळत असून विरोधकांच्या जेवणावळी फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांपंर्यतच मर्यादित राहिल्या असून मतदार हा जागा झाला असल्याने त्यांना बदल हवा असल्याने प्राध्यापक वसंत पुरके सरांना निवडून आणायचं ठरवलं आहे.सोबतच मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष असून हा माझा होमब्लाक असल्याने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पुरके सरांना निवडून आणायचा चंग बांधला असून विरोधकाजवळ मतदारांना देण्यासाठी कुठल्याही प्रकारची साधने सामग्री नसल्याने माझा अपप्रचार करत असल्याचे निदर्शनास आले असून मी आणि माझा कुठलाही कार्यकर्ता विरोधात प्रचार करत नसून आपल्या सर्व मतदारांच्या सहकार्याने आपल्याला कांग्रेस पक्षाचे प्राध्यापक वसंतराव पुरके सरांना निवडून आणून महविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणायचे असल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राळेगाव तालुक्याचे कांग्रेस पक्षाचे नेते अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
