अठावन्न दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता ,प्रहार तालुका अध्यक्ष प्रविंभाऊ गिरी व काँग्रेस पक्षाचे शहर अधक्ष प्रदिपभाऊ ठुने यांच्या प्रयत्नाला अखेर यश

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

                  

राळेगाव शहरातील तहसील कार्यालय समोर गेल्या 58 दिवसापासून सुरू असलेल्या सफाई कामगार यांच्या उपोषणाची आज रोजी सांगता करण्यात आली, या काळात राळेगाव शहरातील आजी माजी मंत्री,पदाधिकारी व राजकीय पुढारी ब शासकीय अधिकारी यांनी उपोषणास भेट देवून उपोषणाची सांगता करण्याचा प्रयत्न केला परंतु सफाई कामगार संघटनेच्या रास्त मागण्या असल्याने कोणताही पर्याय निघाला नाही.परंतु प्रहार चे तालुका अध्यक्ष प्रवीण गिरी व काँग्रेस शहर अधक्ष प्रदीपभाऊ ठूने यांच्या प्रयत्नाने आज रोजी त्यांनी नगर पंचायत व सफाई कामगार यांच्यात समजाष्य घडवून उपोषणाची सांगता करण्यात आली, गेल्या काही दिवसापासून उपोषणाला साखळी उपोषणाला बसलेले उपोषण करते सर्व सफाई कामगार यांच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या नियुक्ती बाबत वारसा हक्काची अंमलबजावणी करण्यात यावी व पुढे चालू ठेवण्यात यावी सदर नियुक्ती बाबत विशिष्ट कार्यालयात मार्गदर्शन मागविण्यात यावे उत्तम मार्गदर्शन प्राप्त होतात सभेत तात्काळ कारवाई करण्यात यावी व सफाई कामगारांच्या विशेष भत्त्यात वाढ देण्यात यावी याचासुद्धा निर्णय घेण्यात यावा याकरिता लेखी स्वरूपात आज रोजी नगरपंचायत येथील नगराधक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी राळेगाव तसेच तहसीलदार साहेब कानडजे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देऊन आज रोजी उपोषण गेल्या 58 दिवसापासून सुरू असलेले सोडविण्यात आले,त्यात तहसीलदार कानडजे साहेब, राळेगाव प्रहार तालुका अधक्ष प्रवीण गिरी राळेगाव नगर पंचायत अध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव भाऊ गिरी, नगरसेवक मंगेश राऊत,नगर सेवक कुंदन भाऊ कांबळे अनिल डंभारे मधुकर राजूरकर .काँग्रेस शहर आधक्ष प्रदीप भाऊ ठूने संतोष कोकुलवर भानुदास राऊत..हमीद शेट.. पठाण इमरान.. पाठण . मंगेश शिवणकर.. बंडू लोहकरे.. व राळेगाव नगर पंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.