अतिवृष्टीचे पैसे खात्यात जमा होन्यास सुरवात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

जुलै 2023 मध्ये तालुक्यात अतिवृष्टी झाली ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडून गेली याचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तालुक्यातील 122 गावांमधील 4021 शेतकरी खातेदारांना ही नुकसानभरपाई मिळणार आहेत अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 1935.54 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून एक कोटी 66 लाख 56 हजार 525 रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार असल्याने त्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड ऍक्टिव्ह असावे ऍक्टिव्ह नसेल तर शेतकऱ्याने आधार केंद्र मध्ये जाऊन बायोमेट्रिक करून आधार कार्ड ऍक्टिव्ह करून घ्यावे आधार कार्ड ऍक्टिव्ह झाल्यावरती संबंधित लाभार्थ्याला आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन बँकेत जावं लागेल बँक अकाउंट सोबत आधार नंबर लिंक करून घ्यावा लागेल त्यानंतर लाभार्थ्याला यादीतील विके नंबर जो तलाठ्याकडून घ्याव लागेल तो सरकार सेवा केंद्रात जाऊन त्यालाही इकेवायसी करावे लागेल इकेवायसी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल लाभार्थी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे ही प्रक्रिया केल्यानंतरच अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल एवढे निश्चित