प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने रवी गीते यांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल पुरस्कार देऊन केले सन्मानित


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


पोलीसाचे जीवन हे पूर्णपणे धावपळीचे असते आणि सोबत असते ती दिवसभर गुन्हेगारी स्वरूपातील लोकांसोबत वावरणे त्यामुळे नक्कीच कुठेतरी मानसिक खच्चीकरण होऊन चिडचिड होणे स्वाभाविक आहे दंगल, दरोडा, खून, मारामारी, अशा घटनांनी दिवस उजाडतो व संपतो.एवढे होवून सुद्धा पोलीस कधीही न थकता आपली कार्य तत्परता दर्शवितात. तसे बघता पोलीस सुद्धा आपल्या मित्रांपैकी एक असतो त्यामुळे त्यांना सुद्धा भावना, वेदना, नातेसंबंध, असतात ही नोकरी सांभाळत असताना सर्वच नातेसंबंध टिकविने व दृढ करणे हे एक फार मोठे दिव्य म्हणावे लागेल. तसेच कर्तव्याचे पालन करीत असताना व ते बजावत असताना वेळप्रसंगी कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध आड न येता पोलीस कोणी चुकीचे काम करत असेल किंवा कायद्याचे उल्लंघन केले असल्यास पोलीस नक्कीच आपले कार्य बजावेल समजा एखाद्या वेळेस जर नात्यातीलच व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन केले तर नक्कीच पोलीस त्यावर कारवाई करताना कसूर ठेवत नाही व कामाला आणि कर्माला आराध्य मानून कारवाई करतात. पण त्या ठिकाणी नात्यात मात्र आपसूकच कटूता येते म्हणून पोलिसांची नोकरी हे जीकिरीची आणि तारेवरची कसरतच म्हणावी लागेल.

८जून २०२३रोजी सकाळी ११ वाजता डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर येथे प्रेस संपादक व पत्रकार संघाचा दिमागदार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या वेळी पोलीस विभागात कार्यरत असलेले रवी व्यंकटी गीते यांना पोलीस क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कोणत्याही पुरस्कारांची उंची ही योग्य व्यक्तीला मिळाल्यानंतर अधिक सुबक होते तसेच काही रवी गीते यांचे बाबत सुद्धा झाले बिटरगाव (बु ) पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अनेक किचकट व गंभीर गुन्ह्यांची पोलखोल करून गुन्हेगाराला कायद्याचा इंगा दाखविला व गुन्हेगार किती हुशार असल्या तरी कायद्यापुढे श्रेष्ठ नाही हे दाखवून दिले तसेच ढाणकी शहरात वास्तव्य असताना सहसा नवीन शहरात किंवा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी कार्य बजावीत असताना केवळ कर्मचारी वृंदच हा मित्रपरिवार असतो.पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा रवी गीते यांनी आपला मित्रपरिवार वाढविला आणि आपली कार्यप्रणाली चोखपणे बजावून आपला प्रचंड मोठा असा मित्रपरिवार जमविला तो जोपासला तसेच कार्यालयाला अधिनस्त राहून पत्रकार बांधवांना सुद्धा झालेल्या गुन्ह्याची वेळोवेळी माहिती देऊन सहकार्य केले. अत्यंत संयमी मृदुभाशी असलेले रवी गीते यांनी कायद्याचे पालन करणाऱ्यांचे नेहमीच पुढाकार घेऊन रक्षण केले. शिवाय सहकार्य सुद्धा म्हणूनच त्यांना मानणारा चाहता वर्ग ढाणकी परिसरात असून आज रोजी तो जिव्हाळा त्यांनी कायम ठेवला हे विशेष. काही दिवसापूर्वी ढाणकी शहरात चोरी होत आहे अशा प्रकारची अफवा असताना व प्रकृती ठीक नसताना रात्रीच्या वेळी सुद्धा त्यांनी आपले कार्य तत्परता दाखवून संबंधित अफवेचा एक प्रकार आहे. हे जनतेला सांगून होणाऱ्या व जन्माला येणाऱ्या अनेक दुर्घटनांना लगाम घातला होता. कोरोना काळात जास्तीत जास्त सॅनिटायझर मोफत स्वरूपात दिले. बिटरगाव (बु) येथे झालेला खून, उमरखेड शहरातील डॉक्टरची हत्या, एका शाळेतील लहान बाळाचा झालेला मृत्यू व काही दिवसापूर्वी एका डॉक्टरकडे झालेली धाडसी चोरी या सर्व घटनांच्या छडा लावण्यात रवी गीते यांचा मोठा सहभाग आहे विशेष शरीरयष्टी सडपातळ असली तरी गूण्याचा गुंता सोडविण्याचे कौशल्य मात्र सशक्त आहे. त्यामुळे मिळालेला पुरस्कार हा योग्य व्यक्तीला मिळाला अशी चर्चा ढाणकी शहरात आहे. मला मिळालेला पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नसून मला नेहमीच सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांरी बांधवांचा व वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे श्रेय मी देतो असे सुद्धा यावेळेस रवी गीते यांनी सांगितले

  .