राळेगाव येथे रक्तरंजित होळी (धुलिवंदन) परप्रांतीय तरुणाचा दगडाने ठेचून खून बारा तासातच पोलिसांनी लावला आरोपीचा छडा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील एका चायनीज सेंटरवर रोज मजुरी करणारा अर्जुनसिंग वय २७ वर्ष या तरुणाचा होळीच्या दिवशी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान दगडाने ठेचून खून करण्यात आला असून ही घटना राळेगाव येथील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला अर्धवट बांधकाम असलेल्या सभागृहाच्या भिंतीजवळ घडली.
या प्रकरणात आरोपी साहेबराव मारुती चव्हाण वय ४२ वर्ष राहणार राळेगाव याला केवळ आठ तासातच राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.
धुलीवंदनाच्या दिवशी दिं २५ मार्च २०२४ रोज सोमवारला दुपारी ३:०० वाजता एक इसम लघुशंका करण्याकरिता सभागृहाकडे गेला असता भिंतीच्या काठी एक युवक मृत अवस्थेत आढळला ही माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असते सर्व पोलिसांनी तपास यंत्रणा कामी लावली तसेच यवतमाळ वरून श्वानपथक बोलवण्यात आले दरम्यान त्याच्याशी ओळख असलेल्या व मैत्री असलेल्या लोकांना चौकशी करिता ठाण्यात बोलवण्यात आले त्यात साहेब चव्हाण याच्यावर संशय गेला असता त्याला पोलीस खाक्यादाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या वादातून खून केल्याची कबुली याबाबत राळेगाव पोलीस माहिती मिळाली की साहेब चव्हाण हा चायनीज सेंटरवर काम करीत होता त्याला कामावर कमी करून त्याच्या जागी अर्जुनसिंग याला कामावर ठेवण्यात आले होते यातच दोघांचा नेहमी भांडण होत पंधरा दिवसाआधी दोघांचे कडाक्याचे भांडण झाले होते या भांडणाचा वचपा काढण्याकरिता अर्जुन सिंगला धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी ३:०० वाजता सभागृहाच्या भिंतीजवळ डोक्यावर दगड टाकून खून केल्याची कबुली साहेब चव्हाण यांनी राळेगाव पोलिसाला दिली त्यावरून आरोपी साहेबराव मारुती चव्हाण याचेवर भांदवी ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण बनसोड, अप्पर पोलीस निरीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर व्येंजने, आधार सिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पोलीस उपनिरीक्षक अमोल मुडे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर रजनीकांत मडावी, सतीश फुके,राळेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर, गोपाल वॉस्टर, रत्नपाल मोहाडे,विशाल कोवे ,सुरज चव्हाणे, संतोष मारबते,यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली दरम्यान मृतक अर्जुनसिंग हा नेपाळ येथील असून त्याच्याकडे कुठलीही आधार कार्ड किंवा पत्ता नाही त्यामुळे त्याचा मृतदेह तीन दिवस ग्रामीण रुग्णालयात ओळख पटेपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे मृतकाची ओळख पटवून मृतदेह संबंधित नातेवाईकांनी ताब्यात घ्यावा असे आव्हान पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे