
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामपंचायत परसोडा येथे आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते राज्यभर या अभियानाची सुरुवात झाली, सदर अभियानातून गावातील सर्व ग्रामस्थांना स्वतःच्या मेहनतीने गावामध्ये पुरस्कार खेचून आणून त्या माध्यमातून गावाचा विकास करण्याची सुवर्णसंधी या अभियानातून प्राप्त झाली. सदर अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार असून, त्यानंतर सदर अभियानातून केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्यावर पुरस्कार घोषित करण्यात येणार आहे.
सदर अभियानाचा ग्रामपंचायत परसोडा येथे शुभारंभ जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी लहुजी आडे, गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव केशवजी पवार यांच्या शुभहस्ते पार पडला. गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव केशव पवार यांनी -मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियान,हे अभियान न राहता लोक चळवळ होऊन या माध्यमातून गावाला विकासाकडे व स्वयंपूर्णतेकडे नेण्याबाबत आव्हान केले. तसेचग्रामसभेमध्ये १००% कर वसुली करण्याबाबत केला निर्धार करण्यात आला व लोकसहभाग व श्रमदानातून गाव विकासाला मदत करण्याबाबत ठरविण्यात आले.
यावेळी सदर शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ जोशना आनंद पन्नासे, उपसरपंच सीमा अमोल मुनेश्वर, ग्रामपंचायत सदस्य बालाजी देठे, मोहन गावंडे पूजा प्रवीण उमाटे, माजी सरपंच रामदासजी जवादे, कडूजी गावंडे, पोलीस पाटील अतुल जवादे, कृषी सहाय्यक धुमाळ साहेब, तलाठी बेंडे मॅडम, सातवकर मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी गजानन भोयर, अमोल जवादे नितेश ठाकरे बंडू जी सातघरे विनोद भोयर विशाल गावंडे उमेश पानपट्टीवार प्रमोद देठे इत्यादी सर्व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
