
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाविकास आघाडीच्या श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आज घाटंजी येथील बालकृष्ण मंगल कार्यालय घाटंजी येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार व विजयोत्सव साजरा करण्यात आला. तर या निवडणुकीत अथक परिश्रम करून आपल्या बूथवर मताधिक्या मिळवून देणाऱ्या बुथ प्रमुखांना खासदार प्रतिभाताई धानोरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर मतदारसंघांतील ज्या ५१ गावात सर्वाधिक मते मिळाली त्या गावकऱ्यांचा सत्कार देखील यात करण्यात आला. नंदू धनरे या काँग्रेस एकनिष्ठ कार्यकर्त्याचा काही दिवसांपुर्वी कॅन्सर या आजाराने मृत्यु झाल्याने त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळावी यासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजयाने चंद्रपूर लोकसभेवर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीचे निकाल पाहता सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर राहिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी( शरद पवार) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासह मित्रपक्षाने उत्कृष्ट कामगिरी करून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे विजयी अश्व जागीच रोखून धरले व विजयश्री आघाडीकडे खेचून आणला. लागलेल्या निकालांमध्ये आर्णी – घाटंजी – केळापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले मताधिक्य असल्याने या विजयाबद्दल आभार मानण्याकरिता श्रीमती धानोरकर यांनी मतदारसंघांत खासदार म्हणुन अनेक दौरे केलें काल (दिनांक ०५ जुलै) रोजी घाटंजी येथे भेट देउन त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. आपल्या नवनिर्वाचित खासदाराचे स्वागत सत्कार करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील बालकृष्ण मंगलम येथे भव्य दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, युवा नेते जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे उपस्थित होते.
तर मतदार संघातील फोटोग्राफर असोसिएशन घाटंजी, शिंपी समाज संघटना घाटंजी, बोधडी येथील टॉवर ग्रस्त शेतकरी व काँग्रेस कमिटीचे तुकारामजी जाधव, राम बाजपेयी, सुभाष जाधव, प्रशांत शेवतकर, ओंकार उरकुडे, रोशन जाधव, संतोष गेडाम, साखरा येथील काँग्रेस कमिटीचे नारायण राठोड, सुनील जाधव, आकाश शिसले, प्रकाश राठोड, विजय फुलके, गोरख कानिंदे ,अरविंद जाधव, मनोहर चौधरी, घाटंजी तालुका आदिवासी काँग्रेस कमिटी चे अमृत पेंदोर, माणिकराव मेश्राम, मधुकर घोडाम, विठ्ठलराव धुर्वे, मारुती कन्नाके, यवतमाळ जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन यवतमाळ शाखा घाटंजी, डोंगरगाव येथील ज्ञानेश्वर महले, प्रकाश खोडे यांच्या सह विविध सामाजिक संघटना, उमेद महिला संघटना यांच्या सह युवकांनी खासदार प्रतिभाई धानोरकर यांचा सत्कार केला.
तर किशोरभाई दावडा, मारोतराव पवार, जयवंतराव चिल्हावार, स्वामीबाबु काटपेल्लीवार, रफिक पटेल, डॉ. विजयराव कडू, जगदीशजी पंजाबी, संजय निकडे पाटील, किसन पवार, विठ्ठलराव धुर्वे, यादव निकम, वासुदेवराव मह्हले,परेशभाई करिया, सुभाष गोडे, शोभाताई ठाकरे, नारायण भोयर सर, राजेश निकोडे साहेब, सागर मानकर, तुरपाबाई पुसनाके, सहदेव राठोड,चौधरी सर, महेंद्र कावळे अध्यक्ष (एससी सेल) मिलिंदजी रामटेके(सरचिटणीस म.प्र.काँ.क), जयप्रकाश काटपेल्लिवार, इकलाख खान पठाण, अभिषेक ठाकरे, अरविंद भुरे साहेब, माणिकराव मेश्राम, मोरेश्वरराव वातीले, मनोजभाऊ डगले, गौतमराव चौधरी,रुपेश भाऊ कल्याणमवार, वैजयंती ताई ठाकरे, अजाबराव लेनगुरे, दशरथ मोहूर्ले, सुनील देठे,सुनीलभाऊ हुड, सागर डंभारे, अक्षय पवार, बबलु राठोड , गणेश उन्नरकर, अरविंद जाधव, स्वानंद चव्हान,अनिल बावने, बळीराम पवार,विनायकराव डंभारे , ॲड विजय भुरे,टोणू राठोड, अनिल वातिले, सतीश रेड्डी सरपंच कुर्ली, संतोष गोर्लेवार,अब्रार पटेल, सुशील भोयर, भूषण मेश्राम, संतोष किनकर, बदू आडे, गुलाब कनंलवार, उत्तम शेंडे, श्रीराम खताळ, मीनाताई डंभारे, राजु मुनेश्वर, भरत दलाल, प्रदीप राठोड, प्रदीप राजूरकर, श्रीकांत गोडे, आकाश येवले, रवी गेडाम, विट्ठल नैताम, भारत वाटगुरे, बौद्दिन काझी, आरिफ काझी, भीमराव कोवे, वामन अवधुतकार, सिद्धार्थ भगत, देवकुमार शेंडे, विकी ढवळे, अनिल राठोड, सुधाकर बावणे, चिखलवर्धा सरपंच जैतुजी मेश्राम,
तर मतदारसंघातील विविध गावाच्या महिला सरपंचा देवधरी येथील संगीताताई संदीप राऊत, पारवा येथील सरपंच संगीता मडावी, कल्पना काकडे सरपंच खापरी, अलका अरविंद देवतळे, सरपंच पार्डी(न) बेबी अनिल पराचे सरपंच झटाळा, दिपाली प्रफुल गावंडे सरपंच यरंडगाव, दुर्गा ताई उगले सरपंच कुंभारी, वंदनाताई नगराळे सरपंच बेलोरा, ज्योती विजय रयांदे, सरपंच चोरंबा, छायाताई बनसोडे शिक्षिका महिला आघाडी आदी उपस्थित होते.
