अपराजित खासदार भावनाताई गवळींची लागणार का राज्य मंत्रिमंडळात वर्णी ?,राजकीय सूत्रांकडून मिळाली माहिती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सलग पाचवेळा निवडणूक अपराजित राहिलेल्या खा. भावनाताई गवळी पाटील यांची येणाऱ्या काळात राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे संकेत राजकीय सूत्राकडून समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग पाचवेळा खासदार राहणाऱ्या प्रभावशाली महिलेची उमेदवारी डावलून ऐनवेळी नांदेड येथील राजश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली होती.

त्यावेळी जाहीर सभेमधून बोलताना त्यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या मुख्य दावेदार असणाऱ्या भावनाताई गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यांचे पुनर्वसन म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला. गवळी यांना उमेदवारी देण्याचीही तयारीही त्यांची होती. मात्र मित्र पक्षाच्या दबावामुळे गवळी यांचा पत्ता कट झाला. त्यांचा राज्य मंत्रिमंडळात
समावेश झाल्यास यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाचा प्रभाव वाढेल, यात शंका नाही व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व पुढील येणाऱ्या निवडणुकांसाठी त्यांचा खूप मोठा फायदा होईल असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे.

भावनाताई गवळी यांची यवतमाळ वाशीम सह अकोल्यातही कामगिरी

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भावनाताई गवळी यांनी यवतमाळ पाठोपाठ अकोला लोकसभा मतदारसंघात भरीव कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष दिले, असे राजकीय कोट्यातून बोलले जात आहे. म्हणूनच त्यांना येणाऱ्या काळात मंत्री पदाची संधी मिळणार, असे संकेत मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तसेच अकोला जिल्ह्यातही त्यांनी प्रचाराची धुरा यशस्वीरित्या पार पाडली.