
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयाची मदत देण्याची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्या कडे मागणी.
विश्वास अग्रो केमिकल्स ली. नवलखा इंदोर (म.प्र) या कंपनीने नेक्सा कार्टी वन या तन नाशकाचे मार्केटिंग केले. नेक्सा कार्टी वन औषधाची निर्मिती ओम क्रॉप सायन्स विश्रामपुर जिल्हा धार यांनी केली आहे. या तन नाशकाची फवारणी केली असता एक हजार एकरच्या वरची पिके जळाली आहे.
तालुक्यातील अल्लीपुर, पिंपळगाव, अलमडोह, रोहनखेडा, सिरसगांव, पवनी, सिरुड इत्यादि परिसरातील कपाशिच्या पिकावर फवारनी केली असता पीके जळाली. प्राप्त माहिती वरून माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी फवारणीने जळालेल्या पिकाची पाहणी केली.
यावेळी सचिन पारसडे, वैभव कातोरे, विकास नागोसे, श्रावण सावरकर, नितीन सेलकर, अजय अडाल, रशीद शेख, आशिष साखरकर, विजय शिवनकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
तणनाशक मुळे जळलेल्या पिकाची तक्रार कृषी अधिकाऱ्यांना करण्यात आली. आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषि अधिकारी मेश्राम, पंचायत समिती कृषी अधिकारी भोयर, शास्त्रज्ञ उमेश झाडोदे, डॉ.मुन इत्यादी अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.

या तणनाशक औषधी कृषी सेवा केंद्र अल्लीपुरचे वैभव कातोरे, सोहम कृ.से.केचे गणेश चंदनखेडे, जय माँ भवानी कृ.से.के अलमडोहचे प्रवीण अडाल, आदर्श कृ.से.के पवनीचे प्रमोद महाजन इत्यादींच्या दुकानातून शेतकऱ्यांनी घेतल्या होत्या. आणि आत्ता पिके जळाल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना संकट ग्रस्त शेतकऱ्यांची झालेली आहे. मितीस कपाशीला १६ हजार रुपये भाव मिळत आहे. यावरून संकटग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयाची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांना दिलेल्या निवेदनातून माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले आहे.
