
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य, शेतमालाला हमीभावासोबत प्रोत्साहन रक्कम तसेच रोजगार, शिक्षण व आरोग्यासारख्या मूलभूत गरजांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली २४ जुलै रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.गुरुकुंज मोझरी येथून सुरू झालेल्या या लढ्याला आता संपूर्ण राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून, या जनआंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडल्या जात आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला लोकशाही मार्गाने बळकटी देण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत केला जात आहे.
संघटनेचे नेते मा. गजाननराव बोन्डे (संस्थापक अध्यक्ष), मा. राजेंद्र कराळे (प्रदेशाध्यक्ष), मा. देवा पाचभाई (विदर्भ अध्यक्ष), मा. महेंद्र भांडारकर (विदर्भ उपाध्यक्ष), मा. सुधीर जवादे (विदर्भ सरचिटणीस), मा. लीनाताई तूरकर (विदर्भ सल्लागार) व सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी एकमताने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.
या आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
शेतकऱ्यांना२४ जुलै २०२५ रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चक्का जाम आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा कर्जमाफी
दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹६,०००/- अनुदान
शेतमालाला हमीभावाच्या पुढे २०% प्रोत्साहन रक्कम
रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या समस्यांवर ठोस उपाय
संघटनेने केंद्र व राज्य शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही दिला आहे.
