
- –
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आपल्या देशात अनेक राजे महाराजे झालेत, पण अत्यंत प्रतिकुल राजकीय, सामाजिक परीस्थितीत तरूण मावळ्यांना एकत्र करून त्यांच्या मनात राष्ट्राभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यांच्या चरित्रात देव ,देश ,धर्म, महिला, शेतकरी,सैनिक, सामान्य जनता या सर्वांप्रती आदर ठिकठिकाणी दिसतो. शत्रुला अतिशय धाक होता. अत्याचा-याला कठोर शासन होत असल्याने तसेच राष्ट्रनिष्ठ लोकांचा योग्य सन्मान केल्याने महाराजांबद्दल लोकांमध्ये आदराची भावना होती. शेतक-यांची काळजी, स्व देशाभिमान, जेष्ठांचा आदर, मजबूत अर्थव्यवस्था यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर व आदर्श राजे म्हणून प्रत्येकाच्या हृदयात अधिष्ठित आहेत. असे प्रभावी विचार आपल्या भाषणातून नागपूर येथिल सुप्रसिद्ध वक्ते व शिवचरित्राचा अभ्यासक अमोल पुसदकर यांनी मांडले.शिवचरीत्रातील अनेक प्रसंग त्यांनी अधोरेखित केलेत. ते रा. स्व. संघाच्या हिंदुसाम्राज्य दिनोत्सवाचे प्रमुख उद्बोधक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विनय मुणोत अध्यक्ष,भारतीय जैन संघटना यवतमाळ जिल्हा (पूर्व विभाग) व अंकुशराव रामगडे विभाग कार्यवाह ,रा.स्व.संघ यवतमाळ विभाग हे मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक बंधु भगिनीं व संघ स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात संपन्न झाला.
