
दिनांक 5/ 9/ 2023 रोजी शिक्षक दिन असून याच दिवशी असंख्य शिक्षकांचे शासनाच्या उदासीन धोरण, शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर करावी लागणारी माहिती शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती अश्या कामातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करा. फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने केली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. शासन एकीकडे शिक्षकांना शैक्षणिक कामात गुंतवत आहेत व दुसरीकडे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मागत आहेत. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, सर्व शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, असे शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, वेतन हे एक तारखेला करण्यात यावे. यासह विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्याची पूर्तता करावी अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत आहे.
आम्हाला फक्त शिकवू द्या या प्रमुख मागणी सह आम्हाला शिक्षक या मूळ नियुक्ती वर काम करून द्या, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ द्या, या करिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा राळेगाव ने सदर सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले. आणि बहुसंख्येने शिक्षक मंडळी या आंदोलनात सहभागी झाले. राळेगाव तालुका शिक्षक समितीचे महेश सोनेकर तालुकाध्यक्ष, गोविंद धोटे कोषाध्यक्ष, विजय दुर्गे कार्याध्यक्ष , संजय एकोणकर उपाध्यक्ष, पुंडलिक देवतळे, भास्कर बाराहाते विनायक एकोकर उपाध्यक्ष, हेमंत सिडाम सरचिटणीस, मनोज मानकर तालुका संघटक, संदीप टुले कार्यालयीन चिटणीस, सागर धनाल कोटवार प्रसिद्धीप्रमुख, किरण देशमुख प्रसिद्ध सचिव , अमोल पोहनकर विशाल किनाके सहसचिव , भूमन्ना कसरेवार सहसंघटक, संजय चौधरी अशोक खेकडे, विनोद उगेमुगे भगवान ठावरी निमंत्रक राजेंद्र खुडसंगे , हरिदास वैरागडे विषय शिक्षकसेल प्रमुख, प्रीती वासेकर महिला आघाडी प्रमुख, योगेश गलाट, सुनील यादव ,वसंता जूमनाके ,मिलिंद वाठोरे, राहुल बोर्डे, तुकाराम हाते ,हनुमान जुमनाके ,योगीराज मेश्राम परिसर प्रमुख, माधुरी नगराळे , तेजस्वी भगत, माया राऊत, मनीषा ताम्हण ,रीना चौधरी, जया वाघमारे, जयश्री पोटे, दर्शना ताकसांडे, सुरेखा जावळेकर तसेच इतर महिला उपस्थित होत्या. दिनेश नागभिडकर ,प्रवीण मलमे , सुजित येंडे,कुणाल भगत, महेंद्र बागडे ,दिनेश सोनकुसळे, राहुल बकाले, अंकुश काकड तसेच इतरही शिक्षक मंडळी या सामूहिक रजा आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले.
