
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. ९ मार्च – 28 फेब्रुवारी विज्ञान दिवसाचे औचित्य साधून
सैनिक पब्लिक स्कूल येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि नवकल्पनांच्या साक्षीने यशस्वीरीत्या संपन्न झाली. या प्रदर्शनीत विविध वैज्ञानिक संकल्पना, प्रकल्प आणि प्रयोग सादर करण्यात आले.
या प्रदर्शनी मधे वर्ग ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थांचा समावेश होता
विद्यार्थ्यांनी पर्यावरण, अंतराळ संशोधन, नवीकरणीय ऊर्जा, रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर प्रकल्प सादर केले. विशेषतः सौरऊर्जेवर चालणारी वाहने, स्मार्ट शेती यासारखे प्रयोग उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे सचिव सत्यवान सिंह दूहन व प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई)हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळते.”
शिक्षक, शाळेतील इतर कर्मचारी वृंद आणि विज्ञानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. या प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले.
या प्रदर्शनी मधे वर्ग ६ वी ची विद्यार्थीनी कु काव्या येण्णारवर हिने प्रथम क्रमांक पटकवला, द्वितीय क्रमांक विपुल सोनटक्के, तरुण पंगुल, पीयूष कुंडलवार, व आयुष लोहकरे या वर्ग ५ वी चे व वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर तृतीय क्रमांकामध्ये वर्ग ६ वी चे अपशा कोहरे, आराध्या जैस्वाल, ऋग्वेद झोटिंग, यश शेंडे, व विहान ठमके याचा समावेश आहे तर चतुर्थ श्रेणी वर्ग ८वी व ९ वी चे विद्यार्थी आर्या पिपराडे, कल्पेश साळवे, पूर्वा भगत, साहिल ठाकूर, वेदांत तिवारी व प्रणय भोयर यांना प्राप्त झाली.
या विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन प्रा.हेमांगी वडतकर, प्रा.उषा साखरकर, प्रा. स्मिता तलवतकर, प्रा. रविना करमरकर यांनी केले होते तर विज्ञान शिक्षक प्रा.गीत खुराणा, प्रा.अस्मिता चौधरी, प्रगती भोयर प्रा. मधुकर उबाले, प्रा.अंकुश गजभिये, कु शृंखला जैस्वाल आणि कु वैष्णवी नक्षने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रदर्शनाचे थाटात नियोजन केले.
शाळेचे अध्यक्ष रणधीर सिंग दूहन, सचिव सत्यवान सिंग दुहन आणि प्राचार्य सचिन ठमके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
