पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे सविधान दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसात पूर्ण करून भारतीय सविंधान २६ नोव्हेंबर या दिवशी भारतवासीयांना सूपूर्द केला या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण देशात २६ नोव्हेंबर हा दिवस सविधान दिवस म्हणून साजरा केला जातो बाबासाहेंबाच्या सविधांनावर संपूर्ण देशाचे कारभार चालतात आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी बोर्डा बोरकर येथील अंगणवाडी केंद्रात संविधान दिवस साजरा करन्यात आला यावेळेस अंगणवाडी सेविका सौ. शोभाताई नैताम, मदतनिस अंजनाबाई शिंदे, गावातील प्रतीष्टीत नागरिक नमलेश तावाडे, विशाल देवगडे, आशिष नैताम, प्रतिक देवगडे, आशिष आरके, महेश आर. नैताम व अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थीत होते