रावेरी येथील सितामाता मंदिराच्या विकासकामाकरिता आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची पर्यटनमंत्री लोढा यांना मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सितामाता मंदिराच्या विकासकामाकरिता ग्रामस्थांनी आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत पर्यटनमंत्री मंगलप्रभातजी लोढा यांना याबतचे निवेदन देण्यात आले आहे.
नागपुर येथील अधिवेशनात राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा.डॉ.अशोकराव उईके यांच्या नेतृत्वात देशातील एकमेव असलेले तालुक्यातील रावेरी येथील सीतामाता मंदिर, त्या मंदिराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री ना. मंगलप्रभातजी लोढा यांची भेट घेऊन सीतामंदीर रावेरी ला 5 कोटी (पाच कोटी रुपये )निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी रावेरी ग्रामवासिया तर्फ निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर मंत्री महोदय यांनी आमदार प्रा.उईके यांची विनंती स्वीकारून ताबडतोब निधी देण्याचे मान्य केले.ह्यावेळी राजू तेलंगे,संदीप तेलंगे,विनोद काकडे, नामदेवराव काकडे,नामदेव कुमरे,उपसरपंच गजानन झोटिंग उपस्थित होते.