सोयाबीन शेतीतून खिशात कवडीच : सोयाबीन पिकाने केली शेतकऱ्याची निराशा

एकरी खर्च १८ हजार, उत्पन्न २५ हजारांचे
(पिक विमा आणि अतिवृष्टी अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी होऊ शकते साजरी)

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव (यवतमाळ): यंदा खैरी परिसरात उत्पादन खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट असे शेतीत एक नवीन समीकरण तयार झाले आहे. दरम्यान, सोयाबीनच्या बाबतीत यंदा एकरी खर्च १८ते२० हजार रुपये आणि त्यातून एकरी उत्पन्न ५ ते ६ पोते याचा आजच्या बाजार भाव प्रमाणे एकरी उत्पन्न२५ ते २७ हजार रुपये नफा केवळ ५ ते ७ हजार रुपये मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रोजचा खर्च, बँकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न शेतकन्यांपुढे आहे.

सोयाबीन लागवडीचा खर्च जर बघितला तर एकरी खर्च पेरणीपूर्वी मशागत जसे नांगरणी,रोटावेटर, , पेरणी, आवळणी, पेरणीनंतर तन नियंत्रण मशागत , फवारणी, सोयाबीन सवंगणे, काढणे व त्यानंतर ट्रॅक्टरने घरी आणणे व बाजारपेठेत नेण्याचा व हमाली खर्च जर पकडला तो पंधरा ते अठरा हजाराच्या जवळपास येतो. आणि या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना उत्पन्नाची सरासरी एकरी पाच ते सहा पोते उतारी आली असून त्यात काही काही शेतकऱ्यांना तर तीन ते चार पोतेच उतारी मिळाली आहे. तेव्हा सोयाबीन लागलेला खर्च हा एकरी पंधरा ते अठरा हजार असून उत्पन्न जर बघितले तर आताच्या बाजारभावानुसार २५ ते २७ हजाराच्या जवळपास झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना एकरी न पहा सात ते आठ हजाराच्या जवळपास झाल्यामुळे पुढचे नियोजन करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

यंदा कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड परिणामी उत्पन्न घटले. सध्या परिसरात सोयाबीन काढणी सुरू आहे. पाऊस पूर्णपणे गायब झाला असून रब्बीची आशा मावळली आहे. त्यामुळे शेतकन्यांना खरिपाच्या मिळेल तेवढ्या उत्पादनावर समाधान मानावे लागणार आहे. परंतु शेतकऱ्यांना खरिपाच्या सोयाबीनमधून मिळणारा आर्थिक फायदा खूपच कमी होत आहे. परतीचा पाऊस देखील नसल्याने रब्बीची पेरणी होणार नसल्याने नुकसानीत असलेल्या खरिपावर पूर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह करण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. दरम्यान, पीकविमा आणि अनुदान दिल्यास शेतकन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

          

काढणीचा दर बाजारभाव जवळपास सारखाच :

सोयाबीनला बाजारात मिळणारा दर ठरलेला नाही. तो रोज कमी-जास्त होतो. मात्र त्याच सोयाबीनला काढण्याचा दर मात्र ठरलेला आहे. सोयाबीनचा यंदाचा हमीभाव ४ हजार सहाशे आहे. बाजारात ४ हजार चारशे ते ४ हजार सातशे दर मिळत आहे. दुसरीकडे सोयाबीन काढणीचा दर एकरी ३ हजार ७०० रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजे काढणीचा दर सोयाबीनच्या बाजारभावाच्या जवळपास आहे. परिणामी उत्पादन खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्नाचा शेतकऱ्यांना अजूनही ताळमेळ लागलेला नाही.