

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
दि 10/6/2024 वार सोमवार रोजी उमरखेड तालुक्यातील उमेद अंतर्गत स्थापन मुळावा प्रभागातील समुहाच्या सर्व महिलांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली तसेच प्रभागाचे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या सभेच्या अध्यक्ष सौ. सारिका गोविंदवार, तसेच सचिव गोदावरी पाटील, कोषाध्यक्ष राधिका माळवे ह्या उपस्थित होत्या तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातू भाऊ देशमुख हे प्रमुख वाहूने म्हणून उपस्थित होते त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून माधुरी दळवी मॅडम यांच्या कामाचे कौतुक केले तसेच त्याना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या त्याच्या हस्ते ग्रामसंघाला एकूण 30 लाख रु cif वाटप करण्यात आला तसेच नारीशक्ती चॅनेल च्या प्रमुख सविताताई चन्द्रे ह्या सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यानी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले, पंचायत समिती च्या माजी सभापती सविताताई कदम ह्याही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तालुका अभियान व्यवस्थापक, रामदास इटकरे,यांनी महिलांना मार्गदर्शन केले तालुका व्यवस्थापक मीना मस्के,यांनी बँक व्यवहार याबद्दल माहिती दिली cc तस्लिम शेख, clf मॅनेजर कनवले ताई वैशाली धुळे ह्या उपस्थित होत्या विदुळ प्रभागाच्या वतीने माधुरी दळवी यांचा प्रभागाचे काम उत्कृष्ट रीतीने करत असल्याने सत्कार करण्यात आला तसेच गिरीजा चद्रवंशी, स्वाती खंदारे यांनी आपले मनोगत अभियानामुळे त्याच्या जीवनात झालेले बदल याबद्दल व्यक्त केले तसेच प्रभागाचे सूत्र संचालन पूजा अमृते, रेखा पाध्ये यांनी केले इंदूबाई दोडके यांनी स्वागत गीत म्हणून सर्वांचे स्वागत केले, प्रास्ताविक माधुरी दळवी प्रभाग समनव्यक यांनी केले त्यात त्यांनी प्रभागातील एकूण समूह ग्रामसंघ, त्याचे कार्य cif vrf याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच लिपिका रेखा पाध्ये यांनी वार्षिक अहवाल वाचुन दाखविला सदर सभा सम्पन्न होण्यासाठी प्रभागातील सर्व कॅडर यांनी खूप परिश्रम घेऊन ही सभा यशस्वी पणे पार पाडली
•••प्रतिक्रिया••
प्रभागाचे काम करत असताना मी माझे कर्तव्य पूर्ण करण्याच्या प्रयत्न करीत आहे अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिला सक्षम व्हावी तिने स्वतःची उपजीविका निर्माण करावी हेच ध्येय असून त्यांना या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मी कटीबद्ध आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मला माझ्या प्रभागातील सर्व कॅडर जे माझ्या हातात हात देऊन सहकार्य करतात त्यामुळे आज माझा प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून निवडला गेला आहे त्यामुळे आज प्रभागात महिलांची सत्कर्म महिला कृषी उत्पादक कंपनी स्थापन झालेली असून तिच्या माध्यमातून महिलांना विकास व्हावा त्यांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती व मी स्वतः कट्टीबद्ध आहे
