
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंबः तालुक्यातील अंतरगाव येथील डोंगरखर्डा ते मेटीखेडा – राळेगाव रोड वरील अंतरगाव जवळ टिपरने भरधाव वेगाने मोटार सायकल ला मागून दिलेल्या धडकेत मेटीखेडा येथील तर्जपाल दोलत डबले 35 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला.प्रथमेश येलकर जखमी ही घटना10डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. तेजपाल दोलत डबलेअसे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरखर्डा कडून मेटीखेडा कडे जाणारा अशोक लेल्याण्ड चा टिपर क्र.(MH 29 CM 0356)डोंगरखर्डा हुन मेटीखेडा कडे जाणाऱ्या दुचाकीस्वार अपघातात तर्जपाल डबले याचा जागीच मृत्यू झाला. व प्रथमेश येलकर गंभीर जखमी झाला याला तात्काळ वसंतराव नाईक वैध्यकीय रुग्णालय यवतमाळ नेण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे.मार्गावरील मागील वर्षभरापासून ओबेरॉय कंपनी चे काम चालू आहे त्या कंपनी भरधाव वाहने चालतात याबद्दल नेहमी बातम्या प्रसारित होत होत्या आणि नुकत्याच झालेल्या सिमेंट रोड व मातीचा घुर उडत असल्यामुळे रस्ता धोकादायक बनला असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे चालकांना समोरचे काहीच दिसत नसल्याने अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. घटना स्तळी वडगाव(जंगल ) ठाणेदार विकास दांडे व उपनिरीक्षक बोखडे बिट जमादार धनंजय शेखदार, पोलीस शिपाई पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मागदर्शन खाली पुढील तपास करीत आहेत.
