सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद पुणे व यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या द्वारा आयोजित तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ ते २९ ऑगस्ट सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे १४, १७, १९ वर्षा खालील कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्या शाळेनी जिल्हा कार्यालयच्या वेबसाईट वर शाळेची नोंदणी केलेली आहे त्या शाळेनी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गट १४ व १९ वर्षा आतील मुले मुली व २९ ऑगस्ट गट १७ वर्षा आतील मुले मुली सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे उपस्थित राहावे असे तालुका क्रीडा संयोजक श्री प्रफुल खडसे सर यांनी कळविले आहे.