
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वाढत्या शहरीकरणाच लोन ग्रामीण भागापर्यंत पोहचलेल दिसत आहे . राळेगांव शहरासह तालुक्यात मोठ्यागांवा मध्ये गावालगतच्या सुपीक जमीनी शेतकरी मोठ्या रकमेत विकून टाकतांना पाहयला मिळत आहे. याच जमीनीवर लेआऊट पाडून प्लॉट विक्री सुरु करुन मोठ मोठी आमीष दाखवून बॅनरबाजी करून प्लॉट खरेदी करणा-या ग्राहकाला फसविल्या जात आहे . राळेगांव शहरात सध्या वर्धा जिल्ह्यातील लेआऊट धारकांचा जास्त जोर आहे सुवातीला पडलेली लेआऊट नगरपंचायत नी केलेल्या रस्त्या मुळे बरे दिसतात नाही तर जायला रस्ताही नसता परंतु शहरातील सद्य स्थितीतील लेआऊट मध्ये कुठल्याच सुविधा दिसत नाही शहरातील माता नगर च्या बाजूला असलेले एक नवीन लेआऊट परीपूर्ण अवस्थेत दिसत आहे . प्लॉट विक्रीची परवानगी देतांना पक्केरस्ते काँक्रीटच्या नाल्या पाण्याची शंभर टक्के हमी विज पुरवठा स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करून देणे हे लेआऊट धारकांचे काम आहे . हया सुविधा जो पर्यंत ते पूर्ण करीत नाही तो पर्यंत विकाची परवानगी संबंधीत विभाग का देत हा ही प्रश्न आहे . राळेगांव शहरातील बहुतांश लेआऊट घर बांधून राहण्यास अयोग्य आहे . तरी नगरपंचायत घरबांधणीसाठी परवानगी का देत हे समजत नाही . या ऊलट लेआऊट धारकांना पूर्ण सोई सुविधा करण्यासाठी तंबी दिली पाहीजे . आजही वस्ती होवून ही पक्के डांबरी सिमेंट रस्ते नाल्या नाही . झाडगांव गावालगत काही लेआऊट पडले आहे एकाही ठिकाणी रस्ते नाल्या नाही वाढोणा बाजार वडकी खैरी येथील पडलेल्या लेआऊट मधील परस्थिती सारखीच आहे . ज्या विभागाची परवानगी लेआऊट पाडून प्लॉट विक्री करायला पाहीजे त्यांनी कधी फेरफटका मारून पाहील आहे का हा गंभीर भाग आहे . प्लॉट घेऊन घर बांधायच म्हणजे विस पंचवीस लाख खर्चे करायचे आणी याच घराला येजा करायला रस्ता राहयचा नाही फक्त पैसा कमवायचा एव्हढच विकणार्याना माहीती असाव अस वाटत . ज्या निकषाला धरून फ्लॉट विक्रीला मंजूरात दिली आहे . ते निकष पूर्ण न करणाऱ्या लेआऊट ची मान्यता रद्द करावी अशी ग्राहकांची मागणी आहे . _______ माऊली नगर बनल मद्य प्राशन करण्याच ठिकाण _______ राळेगांव शहरातील माऊली नगर मध्ये सकाळी मॉरनींग वॉकला गेलेल्यांना दारुच्या बाटल्या वेपर्स च्या पाकीटांचा ढिग पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर पडलेल्या दिसतात फुटलेल्या काचा ही रस्त्यावर असतात हे पूर्ण नगरीत कुठ ना कुठ पाहयला मिळत त्याला कारणही तसेच आहे . रावेरी पॉईंट ते कापसी बायपास पर्यंन्त बियरबार वाईन शॉप हेच आहे मद्यपीना मग प्यायला एकांत लागतो तो जवळच्या खाली असलेल्या लेआऊट मध्ये बसून मिळतो त्यामुळे ह्या नगरी मधे मद्यपी बसतात. या कडे लक्ष कोण देणार हा प्रश्न आहे .
