राळेगाव तालुक्यातील पिंपरी ते वडकीच्या लोकांचे होत आहे बेहाल, गेल्या 15ते 20 वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पिंपरी हे गाव वडकीपासून अंदाजे चार किलो मीटर अंतरावर असून जाण्यासाठी पांदन रस्ता आहे.या रस्त्यावरून या पिंपरी येथील गावकरी, शालेय विद्यार्थी नियमितपणे जाणे येणे करतात शेतकरी सुद्धा शेतात बैलगाडी घेऊन खत वगैरे घेऊन जात असतात त्यावेळी या रस्त्यावर चालणाऱ्याचे होणारे हाल चालणाऱ्यांनाच माहीत. हे गाव काही महाराष्ट्राच्या बाहेर नसून राळेगाव मतदार संघात येत असून या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे आमदार यांना गावकऱ्यांनी रस्ता बनवून देण्यासाठी अनेकदा विनंती केली साकडे घातले परंतु आपणच निवडून पाठवलेले लोकप्रतिनिधी आपल्या समस्यांकडे कानाडोळा करत असून हे लोकप्रतिनिधी मात्र उद्घाटन,भुमीपुजन, कार्यकर्ते नेत्यांचे वाढदिवस साजरे करणे,कार्यकर्त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला भेटी देऊन कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यात मग्न असून जनतेच्या समस्याशी यांना काही देणेघेणे दिसत नसून अशाचप्रकारे दुर्लक्षित वागणूकीचे वाईट परिणाम नुकताच पार पडलेल्या लोकसभेत जनतेनी दाखविले असून आता येणाऱ्या व होणाऱ्या निवडणूका कुठल्याही पुढारी कार्यकर्त्यांच्या भरोशावर नसून आता निवडणुक मतदारांनी मनावर घेतली असून पुढे सुद्धा अशाचप्रकारे जनतेचे प्रश्न सुटणार नसेल तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत प्रतिनिधीजवळ गावकऱ्यांनी व्यक्त केले.