आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी मार्फत राष्ट्रीय पोषण दिन साजरा


आनंद निकेतन कृषी महाविद्यादयालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ( कृशिकण्या) यांनी आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय पोषण दिवस साजरा केला. हा दिवस साजरा करण्यामागचे उद्यिष्टे मनजे आजच्या काळात लोक आपल्या खाण्या बदल खूप बेफिकर झाले आहे. आहाराकडे दुर्लक्ष केल्या मुळे त्यांच्या शरीरला आवश्यक पोषक द्रव मिळत नाही त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आरोग्य आणि आहाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारतर्फे दरवर्षी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. या कार्क्रमाअंतर्गत कृषी कन्यानी विद्यार्धाना पोषण आहाराचे महत्व पटवून दिले.तसेच जंक फूडचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कू. विद्या गोखरे तसेच इतर शिक्षक वर्गानी सहकार्य केले.त्याच प्रमाणे या कार्क्रमाचे सूत्रसंचालन कू. ऋतुजा उमाटे यांनी केले.पूजा डरे व सोनाली चोपडे यांनी पोषण आहाराचे महत्त्व सागितले. वैष्णवी वांगल, शरयू तडाम , निशिगंधा चीमंकर यांनी सहभाग घेतला. व किरणं दिवटे हिनी कार्क्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार ,कार्यक्रम प्रभारी डॉ. महाजन सर ,कार्यक्रम समन्वयक डॉ.पंचभाई सर, कार्यक्रम अधिकारी डॉ.आकोटकर सर यांचे मोलाचे मा्गदर्शन लाभले.