
वणी : तालुक्यातील ४ गावातील ४१ गोरगरीब वयोवृद्ध, विधवा, व दिव्यांग निराधारांना आज ता. ४ मार्च रोजी दिलीप भोयर यांनी योजनेचा आधार मिळवून दिला असून या निराधार लाभार्थ्यांचे अर्ज एकाचवेळी एकाच दिवशी दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी व श्री गुरुदेव सेनेच्या माध्यमातूम राबविण्यात येत असलेल्या एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमार्तगत हा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
श्री गुरुदेव सेनचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी मागील ३ महिन्यात पासून गावागावत जाऊन एक दिवस निराधारांसाठी हा उपक्रम राबवीत आहे या उपक्रमार्तगत गावातच लाभर्थ्यांची निवड करून त्यांना लागणारे सर्व प्रकारचे अर्ज तिथेच भरून घेतल्या जातं आहे. त्यामुळे कधी न लाभ मिळवून न घेणाऱ्या खितपत पडलेल्या गोरगरीब दिव्यांग, वयोवृद्ध, व विधवा माताबघिनींन्ना या निराधाराच्या माध्यमातून जगण्याचा आधार मिळवून दिल्या जातं आहे, महत्वाचे म्हणजे निराधार करण्यासाठी तहसील कार्यालयात ज्या फेऱ्या माराव्या लागत होत्या व लाभर्थ्यांची जे आर्थिक पिळवणूक होत होती ती बंद झाली असून एकाच वेळी एकाच फेरीत एकदाच त्यांचे काम आटोपल्या जातं असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
सदर उपक्रम राबविण्यात आलेल्या मौजा तेजापूर, नेरड (पु.), लाठीबेसा, खान्दला (गोपालपूर ) या गावातील ४१ लाभर्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. एकाच वेळी लाभर्थ्यांचे अर्ज मंजूर झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता सर्वांचे अर्ज स्विकारल्या नंतर वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना घेऊन सर्वांना आपापल्या गावी रवाना करण्यात आले. या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचणकर, खादला ग्रा. पं. चे सरपंच हेमंत गौरकार, तेजापूर ग्रा. पं.च्या सरपंच्या सौ. चंद्रभागा सहारे, उपसरपंच आशिष मालेकर, नेरड ग्रा. पं. च्या सरपंच्या सौ. सुवर्णा जुनगरी, बेसा ग्रा.पं. च्या सरपंच्या सौ. संध्या वाघमारे, सुभाष परचाके, प्रतिमा मडावी, रामदास पखाले, आशिष पानघाटे , हरीचंद्र पुनवटकर, छगन मालेकार, प्रजोत सहारे, आशिष उमाटे, रुपेश पारखी,दादाजी वाघमारे , उज्वला पुनवटकर, अर्चना कडुकर, आदींनी परिश्रम घेतले.
टाळ्यांच्या गजरात शासनाचे आभार
निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाचे तहसीलदार निखिल धुळधर यांचे मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ. डी. एल. सुलभेवार, स्थानिक तलाठी व ग्रामसेवकांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल तहसील कार्यलयात उपस्थित सर्व निराधारांना टाळ्यांच्या गजरात सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचेसह तहसीलचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
