विज्ञान प्रदर्शनीचे महत्व ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांना कळले पाहिजे: आमदार प्रा डॉ अशोक उईके

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात तब्बल 23 वर्षानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाडगाव सारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात होत आहे विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून जिल्हाभरातील विज्ञानाचे प्रयोग हे ग्रामीण भागातील विध्यार्थाना पाहायला मिळतील या प्रदर्शनीच्या माध्यमातून विज्ञानाचे महत्व ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना कळण्यास निश्चितच मदत होणार आहे असे विचार विभागाचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी 51 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटक म्हणून झाडगाव येथे मांडले शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील झाडगाव येथे 51 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाला शिक्षक आमदार अरुण सरनाईक स्वागताध्यक्ष दिलीप कोल्हे शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री राऊत उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे ,नीता गावंडे ,शिवानंद गुंडे गटशिक्षणाधिकारी सरला देवतळे संस्थेचे संचालक चित्तरंजनदादा कोल्हे डॉ कुणाल भोयर प्रशांत तायडे विस्तार अधिकारी स्मिता घावडे चंद्रभान शेळके ,शेंडगे ,विज्ञान संघाचे अध्यक्ष श्याम पंचभाई मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र कडू प्रकाश भूमकाळे,शेखर गायकवाड दिलीप देशपांडे शेखर झाडे, गुलाबराव महाजन,आशिष कोल्हे प्रमोद चौधरी योगेश डाफ, आदी उपस्थित होते 51व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा आहे यावेळी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षकांचाही गौरव करण्यात आला उईके सर पुढे म्हणाले की आता काळ बदलला आहे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे विध्यार्थ्यांना जीवनात प्रगती करायची असेल तर निश्चितच विज्ञानाच्या माध्यमातून विध्यार्थी प्रगती करू शकतात ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांनी विज्ञानाकडे वळण्याची वेळ आली आहे यावेळी शिक्षक आमदार अरुण सरनाईक यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ जयश्री राऊत यांनी सूत्रसंचालन अश्विनी पाळेकर, प्रफुल चोथे यांनी तर आभार प्रदर्शन राकेश बिडकर यांनी केले‌. ही प्रदर्शनी दोन दिवस चालणार असून तालुक्यातील विध्यार्थ्यांना या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे