वाघाच्या हल्ल्यात बैलं जखमी, शेतकरी शेतमजूर भीतीच्या वातावरणात


वाघांच्या हल्ल्यात बैल जखमी झाल्याची घटना वणी तालुक्यांतील रासा गावात घडली आहे
गावातील गजानन रामकृष्ण धांडे या शेतकऱ्याने आपले बैल शेतात चारण्यासाठी नेले असता दिनांक १सप्टेंबर ला दुपारी २ वाजताच्या सुमारास वाघाने बैलावर हल्ला चढविला होता पण शेतातील कामावर असलेल्या शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने वाघाच्या जबड्यातून बैलाची सुटका झाली
दिवसेंदिवस सुकनेगाव गोडगाव इजासंन कुंभारखणी नवरगाव
या गावातील पशुपालकांच्या पशुंवर वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे मागील ४ ते ५ महिन्यापासून या भागांत वाघाचा वावर असल्याने गावातील नागरिकांना वाघापासून धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूर भयभीत आहे तर वाघामुळे शेतात जायला शेतकरी घाबरत आहे
या सर्व गावातील शेतकऱ्यांची वावरे जंगलालगत असल्याने वाघामुळे शेतातील काम अर्धवट सोडून संध्याकाळ होण्याच्या आधीच शेतातून शेतकऱ्यांना निघून यावे लागत आहे या सर्व प्रकाराबद्दल आणि वाघाला जेरबंद करण्यासाठी गोडगाव येथील नागरिकांनी वनविभागाला निवेदन दिले होते पण त्यावर कोणतेही पाऊल उचलतांना वनविभाग दिसुन आले नाही
त्यामुळे आता एखाद्या शेतकऱ्यांवर हल्ला करण्याच्या आधी वाघाचा बंदोबस्ती करण्याची गरज आहे नाही तर खूप मोठी अनुचित घटना घडन्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे