

सहसंपादक : रामभाऊ भोयर
संभाजी ब्रिगेड भारत मुक्ती मोर्चा व वडकी परिसरातील नगरीकां तर्फे जंगी स्वागत करण्यात आले .गेल्या ३५ वर्षांपासून समाजाच्या सर्वांगिन उन्नतीसाठी परिवर्तनवादी प्रगतशिल आणि सकारात्मक कार्य मराठा सेवा संघ करीत आहे . समाजाच्या हितासाठी विविध ३३ कक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत . आज आपल्या समाजासमोर मोठी आव्हाने . उभी आहेत जातीयवाद , गुन्हेगारी , भ्रष्टाचार , धार्मिक आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे . धार्मिक सलोखा दुभंगला आहे आणि समाजाची मजबूत विण विस्कटत चालली आहे . समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे . यामुळे समाजमन अस्वस्थ , संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे . त्याच्या थेट परिणाम आपल्या सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे . ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक – युवती , विद्यार्थी, शेतकरी , प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी , समाजाच्या एकसंध करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यामातून जिजाऊ रथयात्रा २०२५ अंतर्गत मराठा जोडो अभियान म्हणजे महाराष्ट्रातील बहुजन समाज जोडो अभियान आयोयोजीत करण्यात आले . रथयात्रेचा कालावधी आणि मार्ग प्रारंभ : शहाजी महाराज जयंती १८ मार्च २०२५ स्थळ भोसले गढी वेरुळ . ते १ मे महाराष्ट्र दिन / कामगार दिन स्थळ : लाल महाल पुणे येथे समारोप होईल आज दि १० एप्रिल ला वडकी येथे जिजाऊ रथ यात्रे चा जंगी स्वागत करण्यात आले . वडकी वासीया तर्फे राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ च्या मुर्तीला वणी विधान सभेचे आमदार मा संजय भाऊ देरकर .प्रिशंका ताई गोटे मनिषा ताई ठमके अरविंद भाऊ फुटाणे व सर्व उपस्थित मान्यवरा कडून माला अर्पन करण्यात आले .वडकी पोलीस स्टोशन चे ठाणेदार मा सुखदेवजि बोरखडे साहेब व वडकी ग्राम पंचायत चे उप सरपंच मा शौलेष भाऊ बेलेकर . संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शाहरूख भाई शेख भारत मुक्ती मोर्चा चे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ क्षिरसागर यांच कडून जिजाऊ रथ यात्रेचा स्वागत करण्यात आला . प्रमुख उपस्थिती मनोज भाऊ भोयर रसुल भाई शेख सलमान भाई पठान प्रमोद भाऊ बोंबले चंद्रशेखर भाऊ कोवे अरुण भाऊ फुटाणे जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अयुब खा पठाण प्रविन भाऊ बेलेकर प्रदिप भाऊ ठमके आकाश भाऊ कुळसंगे बाबारावजी महाजन, यादवजी भगत, गणेश गोळकार,अंकुश भाऊ देठे व समस्त गावकरी उपस्तित होते . सुत्र सुंचालन मनोज भाऊ क्षिरसागर यांनी केले तर आभार प्रर्देशन सलमान पठान यांनी केले
