
सहसंपादक : रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव येथे शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा खुली वेशभूषा स्पर्धा गड किल्ले स्पर्धा वकृत्व स्पर्धा आधी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या घेण्यात आलेल्या स्पर्धेपैकी पर्यावरणपूरक गडकिल्ले स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून श्रीवत्स पुसनाके या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला रोख बक्षीस २१०० रूपये प्राप्त झाले.तसेच दक्ष पुसनाके या विद्यार्थ्यांने स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवून त्याला रोख बक्षीस १००० रूपये प्राप्त झाले.
या पर्यावरणपूरक गडकिल्ले स्पर्धेत शाळेतील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या १२ विद्यार्थी या स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. परंतु जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथील दोन विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक गडकिल्ले स्पर्धेला प्रथम व तृतीय असे दोन बक्षीसे पटकावली .
शाळेत आम्ही विद्यार्थ्यांनकरिता विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असतो तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सतत प्रोत्साहित करीत असतो त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथम आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाले आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे, मंगला आगरकर, रेखा कोवे, अर्चना सुरजुसे व सोनल नासरे यांनी अथक परिश्रम घेतले व शाळेच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो आहे.
मुख्याध्यापिका
भारती ताठे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी
