
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तशा तशा प्रत्येक जाती जमातीच्या संविधानिक मागण्या घेऊन शासनाकडे समाजातील जागरुक नागरिक शासनाकडे आपल्या मागण्या पोटतिडकीने मांडत आहे.अशाचप्रकारे दिनांक 7/ 10 /2024 ला आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक मागण्या घेऊन यवतमाळ जिल्हा अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या दालनात भेट घेऊन समाजाच्या संविधानिक मागण्या बाबतीत चर्चा करण्यात आली.आगामी विधानसभा निवडणुकाची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाने गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक मागण्या मान्य न केल्यास विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून या बाबतीत जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन शासनाला आमच्या मागण्या कळविण्यात याव्या अशी विनंती केली.त्यावेळी राज्य सचिव रामदास नेहारे, उपोषणकर्ते सचिन चचाणे हरिभाऊ सहारे मनोज मुरखे काशिनाथ वाघाडे भानुदास कोयरे उपस्थित होते. उपस्थितांना हा अहवाल आजच शासनाला पाठविणार असल्याने जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
