जेवली येथे 315000 रु चा गांजा जप्त,पोलीस स्टेशन बिटरगांव ( बु ) ची कार्यवाही

गोपनीय बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली कि जेवली शेत शिवारामध्ये सदाशिव अमरशिंग साबळे रा. जेवली यांनी स्वतःचे मालकीचे शेतामध्ये गांजा च्या झाडाची विक्री करण्यासाठी लागवड केली असून काही झाडे कापून ठेवली आहेत तर काही गांजाचे झाडाची पाने प्लास्टिक पोत्यामध्ये शेतामधील घराचे बाजूला ठेवलेले अशी खात्रीशीर माहिती वरून सदर ची माहिती वरिष्ठाना देऊन संतोष मनवर ठाणेदार व पोस्टाफ कुर्षी अधिकारी सोमनाथ जाधव,नायब तहसीलदार पंधेर सरकारी पंच, यांचे सह शेतात जाऊन रेड केला असता शेतामध्ये कापूस व तुरीचे पिकामध्ये एकूण 22 झाडे व शेतामध्ये वाळण्या करिता टाकलेला, पोत्यामधील गांजा असा एकूण 21 किलो किंमत 315000 रु मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध , पोहेका रवी गिते यांचे फिर्याद वरून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे NDPC कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर ची कार्यवाही मा. श्री कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री पीयूष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ मा. श्री हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात संतोष मनवर ठाणेदार सफौं. गजानन कनाके पोहेका रवी गिते, राहुल कोकरे पोना देविदास हाके, पोका, प्रवीण जाधव, निलेश भालेराव, हिंमत जाधव, दत्ता कुसराम, आंबादास गारुळे, दत्ता कवडेकर यांनी केली